Private Advt

ट्रॅक्टर उलटून तीन युवक जागीच ठार

भडगाव : वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून यात तीन जण जखमी झाले आहेत.

ट्रॅक्टर उलटून अपघात
भडगाव ते वडघे फाट्याच्या दरम्यान बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास वाळूची उचल करण्यासाठी जात असलेले ट्रॅक्टर पलटी झाले. यामुळे सुरेश अशोक शिंदे (२७, रा. टोणगाव), रवी सुरेश शिंदे (वय २५) आणि मयूर भोई (२१, रा. आझाद चौक, भडगाव) हे तीन युवक ट्रॅक्टरखाली दबले गेले. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन या तिघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होत असतांनाच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघातात हे झाले जखमी
या अपघातात शामराव शिंदे (२३), आकाश रामकृष्ण पवार (२१) आणि कैलास पवार (२१, सर्व रा.टोणगाव, भडगाव) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत भडगाव पोलीस स्थानकात नोंदणीचे काम सुरू होते. यातील सुरेश शिंदे आणि रवी शिंदे हे एकमेकांचे चुलतभाऊ होते. या दोघांच्या मृत्यूमुळे परीसरावर शोककळा पसरली आहे. तर टोणगावातही शोककळा पसरली आहे