Private Advt

मुक्ताईनगर मतदारसंघातील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर

माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा यशस्वी पाठपुरावा : विविध विकासकामे होणार

मुक्ताईनगर : माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या पाठपुराव्याने मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री हनीफ मुश्रीफ यांच्याकडे पदाधिकार्‍यांनी निधीची मागणी केल्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजू निधीतून विविधांगी कामे होणार असल्याची माहिती माजी मंत्री खडसे यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांनी दिली.

मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात होणार ही विकासकामे
आंदलवाडी, ता.रावेर येथील कोळी वाड्यातील सभागृहाचे बांधकाम, कोचुर बु.॥, ता.रावेर येथे रस्ता काँक्रीटीकरण, वाघोदा खुर्द, ता.रावेर येथे रस्ता काँक्रीटीकरण, दसनुर, ता.रावेर येथे रस्ता काँक्रीटीकरण, थोरगव्हाण, ता.रावेर येथे सभामंडपाचे बांधकाम, खिर्डी, ता.रावेर येथे शादिखाना हॉलचे काम, चिंचखेडसीम येथे रस्ता काँक्रीटीकरण, चिंचखेड येथे रस्ता काँक्रीटकरण, ऐनगाव, ता.बोदवड येथे रस्ता काँक्रीटकरण, राजूर, ता.बोदवड येथे रस्ता काँक्रीटकरण, बोदवड शहरात तेली समाज सभामंडप, चिंचखेडसीम, ता.बोदवड येथे सभा मंडप, वाकी, ता.बोदवड पेव्हर ब्लॉक, एनगाव, ता.बोदवड येथे खंडेराव मंदिरासाठी सभा मंडपाची उभारणी, घाणखेड, ता.बोदवड येथे खंडेराव मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक बसविणे, घाणखेड, ता.बोदवड येथे सुशोभीकरण व स्मशानभूमी बांधकाम, शिरसाळा, ता.बोदवड येथे रस्ता काँक्रीटकरण करणे, शेलवड, ता.बोदवड येथे विठ्ठल मंदिराजवळ सभागृह, शेलवड, ता.बोदवड येथील रस्ता काँक्रिटीकरण, पळासखेडा तांडा, ता.बोदवड येथे सभागृह, साळशिंगी, ता.बोदवड येथे रस्ता काँक्रिटीकरण, जलचक्र, ता.बोदवड येथे सभागृह बांधकाम, निमखेड, ता.बोदवड येथील रस्ता काँक्रिटीकरण, वरखेड, ता.बोदवड येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, सुरवाडे ते विचवे रस्ता मजबुतीकरण करणे, काकोडा येथे मुस्लिम कब्रस्तानची संरक्षण भिंत बांधणे, पारंबी येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे, हिवरा, ता.मुक्ताईनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, मोरझिरा, ता.मुक्ताईनगर येथे सभामंडप बांधकाम करणे, सारोळा, ता.मुक्ताईनगर येथे बजरंग बली मंदिराचे सभागृह बांधकाम करणे, पिंपरी अकराऊत येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे,
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथे व्यायामशाळा बांधकाम करणे, नायगाव, ता.मुक्ताईनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे,
चांगदेव, ता.मुक्ताईनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, मुक्ताईनगर येथे संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, मानेगाव रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, निमखेडी बुद्रुक येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, मन्यारखेडा रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, चारठाणा, ता.मुक्ताईनगर येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे,
रुईखेडा, ता.मुक्ताईनगर येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे,
मुक्ताईनगर येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे,
मुक्ताईनगर येथील गोदावरी नगरात चौक सुशोभीकरण करणे, मुक्ताईनगरातील माळी समाज मंगल कार्यालयात पेव्हर ब्लॉक बसविणे.