Private Advt

छावडीत पित्याचा मुलानेच केला खून : दारूसाठी पैसे न दिल्याने डोक्यात मारला लाकडी दांडा

धुळे : दारू पिण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपी मुलाने पित्याचाच खून केला. धुळे तालुक्यातील छावडी येथे बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सजन तिरसिंग पवार (रा.डुबक्या नाल्याजवळ, छावडी) असे मयताचे नाव असून संशयीत आरोपी तथा मुलगा सतीश सजन पवार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

वडिलांच्या डोक्यात टाकला लोखंडी दांडका
सजन पवार व त्यांचा मलुगा सतीश हे बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात जेवण करीत असताना सतीशने वडीलांकडे दारूसाठी पैशांची मागणी केली मात्र त्यांनी पैसे दिले नाही, त्याचा राग येवून सतीशने पावडीच्या लोखंडी दांडक्याने सजन पवार यांच्या डोक्यावर दोन ते तीन वेळा वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शंकर कैलास पवार यांच्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिसात आरोपी सतीश सजन पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली.