Private Advt

सोमय्याच नाही तर भाजपच्या 28 जणांचे रहस्य खुले करणार : संजय राऊत

मुंबई : किरीट सोमय्या हे हिमनगाचे एक टोक असून आता भाजपच्या 28 नेत्यांचे प्रकरण काढणार असल्याचा इशारा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांच्यावर इडीच्या चौकशीत असलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये निधीपोटी सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानकडे आले आहेत. भाजपा भ्रष्टाचारावर लढा कसा देत आहे हे या निधीवरून दिसून येत असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

भाजपाच्या 28 जणांची होणार चौकशी
ईडीशी संबधित सर्वच चौकशी होणार असून जशी नवाब मलिक यांची केली जात आहे, आम्ही पण सामोरे गेलो आहे, तसेच इडीशी संबंधातून या 28 जणांची पण एकेक चौकशी होणार, असे संजय राऊत यांनी वक्तव्य केले असून ते भाजपचे 28 जण कोण? याबाबत चर्चा रंगत आहे.