Private Advt

चोपडा शहर पोलिसांनी 20 लाखांचा गुटखा केला जप्त

चोपडा : चोपडा शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तालुक्यातील नागलवाडी रोडवर सुगंधित पानमसाला व गुटख्याची वाहतूक करणारे वाहन जप्त करीत सुमारे 20 लाखांचा गुटखा पकडल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ते नागलवाडी रोडवर असलेल्या शिवमंदिरात जवळून एक पिकअप व्हॅनमध्ये बेकायदेशीररीत्या सुगंधित पानमसाला व गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर नागलवाडी रोडवर मंगळवारी रात्री आठ वाजता वाहन क्रमांक (एम.एच.20 सी.टी.6964) या वाहनाला अडवल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्यात
20 लाख 40 हजार 400 रुपये किंमतीचा सुगंधित पानमसाला तंबाखू आणि गुटखा आढळला. या प्रकरणी संशयीत आरोपी चंद्रकांत लक्ष्मण हटकर (35, रा.तांबापुरा) आणि अजय अरुण पाटील (चोपडा) यांच्या विरोधात पोलिस नाईक हेमंत कोळी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.