Private Advt

जगभरातील स्वातंत्र्य प्रेमींचे प्रेरणा स्रोत महाराणा प्रताप

जळगाव ः परकीय आक्रमणकारी विरुद्ध आयुष्यभर संघर्ष करून आपला धर्म, कला व साहित्य, संस्कृतीचे संरक्षण करणार्‍या या महापुरुषाचा इतिहास मात्र आपल्या पाठ्यपुस्तकात दोन तलवारी बाळगणारा अल्पशा साधन सामग्री व सैन्यासह संघर्ष, हळदी घाटी युद्ध इत्यादी पर्यंत सिमीत करून महान अकबर पर्यंत आणून ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर जग भरातील सत्ता संघर्ष व त्या त्या देशाचे झालेले संस्कृती संहार याचा देखील विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.

धर्म व संस्कृतीचा विनाश
इसवी सनाच्या सहाव्या शतकात एका असंस्कृत जमातीने तलवारीच्या बळावर इसवी सन 622 ते इसवी सन 635 पर्यंत बारा वर्षाच्या कालखंडात अरबस्थानातील सर्व मूर्तिपूजकांचा चे इस्लामीकरण करून त्यांचा धर्म व संस्कृतीचा विनाश केला. इसवी सन 634 ते इसवी सन 651 पर्यंत पर्शिया चे संपूर्ण इस्लामीकरण केले. इसवी सन 640 ते 655 पर्यंत इजिप्त ची संस्कृती व धर्म नष्ट करून इस्लामीकरण केले. उत्तर आफ्रिकन देश जसे अल्जेरिया, ट्युनिशिया, मॉस्को इत्यादी देशांचे इसवी सन 640 ते 711 पर्यंत इस्लामीकरण केले. तुर्कांनी 651 ते 751 पर्यंत संघर्ष केला, परंतु 100 वर्षात, याचे देखील संपूर्ण इस्लामीकरण करण्यात आले. इंडोनेशिया चे इसवी सन 1260 ते इसवी सन 1300 पर्यंत संपूर्ण इस्लामीकरण करण्यात आले.

सातव्या शतकात बाप्पा रावळांचा उदय
सा पार्श्वभूमीवर भारताचा विचार करूया इसवीसन 700 च्या सुमारास इराण वर संपूर्ण वर्चस्व स्थापून झाल्यावर त्यांची दृष्टी भारतावर पडली. भारतातील राजपुतांनी प्रखर संघर्ष करून आक्रमण परतवून लावले. अरबस्थानापासून ते आफ्रिका, इराण व बरेच युरोपियन, सीरिया, मोरोक्को, ट्युनिशिया, तुर्की इत्यादी देशांचे इस्लामीकरण झालेले असताना भारतात इसवी सन सातव्या शतकात बाप्पा रावळांचा उदय झाला. या महापराक्रमी पुरुषाने आक्रमन कारीना अफगाणिस्ताना पर्यंत पिटाळून लावले, स्वतः खलिफा प्राणांची भीक मागण्यास बाद्य केले. कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य हिरावून सरासरी वीस वर्षाच्या कालखंडात इस्लामीकरण करणार्‍या आक्रमणकारीना इसवी सन सातशे ते इसवी सन सोळाशे पर्यंत स्वाभिमानी व प्रखर राष्ट्रभक्त राजपुतांनी तलवारीच्या जोरावर परतवून लावले.

राजपुतांचा संघर्ष परकीयांविरुद्ध होता
इसवी सन 735 बाप्पा रावल यांच्या 76 पिढ्यांनी भारताचा इतिहास अबाधित ठेवला त्यात राणा प्रताप यांचे योगदान लक्षणीय होते. महाराणा प्रताप, दुर्गादास राठोड, मिहिर भोज, दुर्गावती चव्हाण, परमार, सोलंकी सह समस्त 36 राजपूत कुळांनी रक्तरंजित संघर्ष करून भारताचा धर्म, संस्कृती नष्ट होऊ दिली नाही. आपल्या मातृभूमीसाठी अतिउच्च जीवन मूल्यांसाठी राजपुतांच्या कैक पिढ्या नष्ट झाल्या. जगाच्या इतिहासात असे एकही उदाहरण सापडणार नाही राजपुतांचा संघर्ष कुणाच्या धर्माविरुद्ध नाही तर परकीयांविरुद्ध होता.

19 व्या शतकात लिहिला इतिहास
भारताचा इतिहास संशोधनावर प्रभाव टाकणार्‍या ब्रिटिश भारताचा इतिहास हा ग्रंथ जेम्स मिल याने 19 व्या शतकात लिहिला. त्याने भारतीय इतिहासाची 1) हिंदू इंडिया 2) इस्लामिक इंडिया 3) ब्रिटिश इंडिया असे तीन कालखंडात विभागणी केली. या ग्रंथात भारताचा इतिहास धार्मिक पायांवर समजून देण्याची चुकीची अन्वेषण पद्धती स्वीकारून इतिहासाची चुकीची मांडणी केली. हिंदुत्व वादी इतिहास लेखकांनी हिंदू धर्माचे प्राचीन काळापासून चे असलेले प्रभुत्व परकीय मूर्ख आक्रमकांनी नष्ट केले असे सांगून हिंदूंच्या धर्मभावना भडकवल्या तर मुस्लिम जमात वाल्यांनी चारशे वर्ष इस्लाम धर्माचे अनिर्बंध सत्ता होती ती शिवाजी महाराजांनी संपवली असे सांगून मुस्लिमांना भडकवले. हिंदू व मुस्लिम असे दोन राष्ट्र अस्तित्वात असल्याचे प्रतिपादन करून द्वि-राष्ट्रवादाच्या सिद्धांताचे इतिहासिक अधिष्ठान प्राप्त झाले व भारताची धर्माच्या आधारावर फाळणी झाली. ब्रिटिशांची डिव्हाईड रूल पॉलिसी यशस्वी ठरली. स्वातंत्र्य उत्तर काळात बहुमताच्या आधारे लोकशाही दृढ करण्याच्या हव्यासापोटी वामपंथीय इतिहासकारांच्या मदतिने क्रमिक पाठ्यपुस्तकातून राजपुतांच्या रक्तरंजीत संघर्षाला दुर्लक्षित केले. आक्रमण कारीचा इतिहास सर्व धर्म समावेशक, असल्याचे महिमा मंडन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने द्रश्ट्रेपणाने हिंदवी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, स्वतः सिंहासनाधिष्टीत होऊन सार्वभौमत्वाचा ची ग्वही दिली त्यांनादेखील लुटारू ठरविण्याचा आचरटपणा या इतिहासकारांनी केला. ज्यांना आपला इतिहास माहीत नाही ते भविष्य घडवू शकत नाही. उइडए च्या पाठ्यपुस्तकात चुकीच्या इतिहासाची छउएठढ द्वारे दुरुस्ती करून सत्य इतिहास समाविष्ट केल्याचे समजते. तरुणांनी गुगल वर शोध घेऊन सत्य इतिहास समजून घ्यावा व प्रशासनास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा आग्रह धरावा ही अपेक्षा, राणा यांच्य जयंती निमित्त संकल्प करूया धन्यवाद.

चंद्रसिंग रामदास पाटील ,
सदस्य क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह,
बहुउद्देशीय मंडळ, जळगाव मो.9689975089