Private Advt

भुसावळातील 63 धार्मिक स्थळांनी घेतली ध्वनिक्षेपक वापराची परवानगी

भुसावळ : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारपासून मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन केल्यानंतर या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी बडा हनुमान मंदिर, राम मंदिर, मोठी मशीद व अन्यत्र बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तर दुसरीकडे बुधवारी शहरातील 17 मंदिरे, 38 मशिदी, 2 मदरसे आणि 6 बुद्ध विहारांशी निगडीत प्रमुखांनी पोलिस ठाण्यातून नियमानुसार ध्वनीक्षेपकासाठी परवानगी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस निरीक्षकांची उपअधीक्षकांनी घेतली बैठक
मनसेच्या नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी मंगळवारी रात्रीच शहरातील पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. त्यात कार्यक्षेत्रातील मंदिर, मशीद आणि अन्य धार्मिक स्थळांबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बुधवारी सकाळपासून बंदोबस्त तैनात झाला. मनसेचे पदाधिकारी अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने मशिदीबाहेर भोंगे किंवा अन्य साहित्य आणल्यास त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना असल्याने पोलिस अ‍ॅक्शन मोडवर होते.