Private Advt

प्रेमिका समोर येताच वराने लग्न मंडपातून ठोकली धूम

नवी दिल्ली : प्रेमसंबंध असताना युवक आपली फसवणूक करून दुसरीशी घरोबा करीत असल्याची माहिती प्रेयसीला कळताच तिने लग्न मंडप गाठून रुद्रावतार धारण केला व हा प्रकार पाहताच उपवराला चांगलाच घाम फुटला व त्याला लग्नातूनच पळ काढण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील राहरा येथे ही धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर नियोजित वधूने विवाह रद्द करीत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

अन नवरदेवाने रथावरून ठोकली धूम
अमरोहा जिल्ह्यातील राहरा परिसरात लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान हा सारा प्रकार घडला आहे. वराची मिरवणूक काढण्याची तयारी सुरू होती. त्यादरम्यान एकच गोंधळ झाला. याचे कारण म्हणजे मिरवणुकीत वराची प्रेमिका आली. धमकी देत चप्पल काढून ती वराच्या दिशेने धावली. मैत्रिणीचे हे रूप पाहून रथात बसलेल्या वराने उडी मारून दुचाकीवरून पळ काढला.

सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल
विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याचबरोबर प्रेयसीने एसपींना तक्रार पत्र देऊन चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, वधूपक्षाने लग्नात दिलेले सामान आणि रोख रक्कम वराच्या मंडळीकडून परत घेतली आहे.
संभल जिल्ह्यातील दरियापूर राजदेव गावातील रहिवासी तरुण – नवरदेव अक्षय कुमारची मिरवणूक शुक्रवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या राहरा परिसरातील गावात आली. बँडबाजाच्या निणादात मिरवणूक निघाली होती. वर गाडीवर बसला होता. यादरम्यान, संभल जिल्ह्यातील एका मुलीने मिरवणुकीत पोहोचून स्वत: वराची मैत्रीण असल्याचे सांगून गोंधळ घातला.

तीन वर्षांपासून दोघे रीलेशनशीपमध्ये
या दोघांचे तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांची एंगेजमेंटही झाल्याचा दावा केला जात आहे. आता तो फसवून लग्न करतोय, असे म्हणत तिने चप्पल काढली आणि गाडीवर बसलेल्या वराकडे धावली. हे पाहून वराने लगेच गाडीवरून उडी मारली आणि मित्राच्या दुचाकीवर बसून जागेवरून पळ काढला.

गोंधळ घालणार्‍या तरुणीसह कुटूंबियांना मारहाण
मुलीची माहिती मिळताच पोलिसांनी लग्न थांबवले. वराला आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले. युवती व वधू पक्षाचे लोक पोलीस ठाण्यात पोहोचले. तरुणीने फसवणुकीचा आरोप केला आहे. दुसरीकडे, पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या वधूपक्षाच्या मंडळीनीं लग्नात लाखो रुपयांचे सामान दिल्याचे सांगितले. तसेच लग्नाच्या तयारीसाठीही बराच पैसा खर्च झाला आहे. लग्नापूर्वी व लग्नात झालेला खर्च वराच्या बाजूने मिळावा, अशी मागणी केली. त्यामुळे वधूपक्षाने लग्नात दिलेले सामान वगैरे परत केले जात आहे. दरम्यान, मिरवणूकीत गोंधळ करणार्‍या मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबीयांना मिरवणुकीतील काही जणांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याचवेळी वधूच्या बाजूने या प्रकरणाची माहिती मिळताच तिने लग्नास नकार दिला. दुसरीकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.