Private Advt

आंदलवाडीतील बालिकेचा तोल जावून पडल्याने मृत्यू

माकडे झाडांवरून उड्या मारत असताना बालके सैरा-वैरा पळताना दुर्घटना

रावेर : वडिलांच्या मृत्यूनंतर मामांकडे आंदलवाडीत आलेल्या सहा वर्षीय बालिकेचा तोल जावून पडल्याने मेंदूला मार लागल्याने मृत्यू झाला.28 एप्रिल रोजी सायंकाळी माकडे झाडावरून उड्या मारत असतानाच बाहेर खेळणार्‍या मुली सैरावैरा पळाल्या. त्यात तोल जाऊन काँक्रीटच्या रस्त्यावर पडल्याने पूर्वीच्या मेंदुला मारला लागला व तिचा मृत्यू झाला. पूर्वा प्रदीप कोळी (6, रा.आंदलवाडी, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.

तोल जावून रस्त्यावर पडल्याने मृत्यू
निंबोल येथील मूळ रहिवासी असलेली पूर्वीच्या वडिलांच्या सुमारे चार वर्षांपूर्वी निधन झाल्याने ते तीन र्षांपासून मामाच्या गावी आंदलवाडी येथे वास्तव्यास आली होती. गल्लीतील मुलींसोबत खेळत असताना माकडे झाडांवरून उड्या मारत असताना मुली सैरा-वैरा पळू लागल्याने पूर्वीचा तोल गेला व ती रस्त्यावर जावून पडल्याने ती जखमी झाले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना शनिवार, 30 एप्रिल रोजी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला. 30 रोजी रात्री उशिराने तिच्यावर निंबोल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.