Private Advt

धक्कादायक ! : शरीरसुखाची मागणी करणार्‍या नराधम मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : आई-मुलाच्या नात्याला काळीमा ठरणार्‍या मद्यपी मुलाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी मुलाने आपल्याच आईकडेच शरीरसुखाची मागणी केल्याने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आरोपीने स्वतःच्या आईकडेच जेवण झाल्यानंतर शरीर सुखाची मागणी केली होती. एवढ्यावरच आरोपी न थांबता सोबतच पीडित आईच्या नातीवरदेखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या या विकृत मानसिकतेमुळे पीडित आईला मोठा धक्का बसला.

निगडी पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा
पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे आईनेच स्वतःच्या मुलाविरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून निगडी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली.