Private Advt

भगवान परशुराम जन्मोत्सव समिती अध्यक्षपदी उमाकांत शर्मा

भुसावळ : ब्राह्मण सामाजाचे आराध्य दैवत श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने शहरातील श्री हनुमान मंदिरात समाजाची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2022 ची निवड करण्यात आली. श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती अध्यक्षपदी कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) तर उपाध्यक्षपदी आशिष तिवारी, सचिवपदी दीपक पाथरकर, खजिनदार देवेश कुळकर्णी यांची निवड करण्यात आली.

यांची बैठकीला उपस्थिती
या प्रसंगी कैलास उपाध्याय, पंडित रवीओम शर्मा, जयप्रकाश शुक्ला, प्रशांत वैष्णव, रमाशंकर दुबे, विनोद शर्मा, भगवान शर्मा, भुषण वैद्य, आनंद जोशी, आशुतोष दलाल, सागर पतकी, वेद ओझा, अ‍ॅड.अभिजीत मेने, केर्‍हाळकर गुरुजी, खुशाल जोशी, रूपेश तायडे, प्रशांत उपासनी, गणेश साकी, ऐ के तिवारी, गौरव हिंगवे, चेतन शर्मा, आदित्य शर्मा, अभिलाष नागला, मयूर तिवारी, अ‍ॅड.संजय तिवारी, गोपाल जोशी, दिनेश जोशी आदी ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.

3 रोजी शहरात भव्य शोभायात्रा निघणार
रविवार, 1 मे रोजी राम मंदिर सराफ बाजारात संध्याकाळी सहा वाजता नारायण जी ओझा (जळगावकर) यांचा भजन संध्या कार्यक्रम, 2 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री साईबाबा मंदिर ते परशुराम मंदिर तापी नदीमार्गे दुचाकी रॅली, 3 रोजी श्री अष्टभुजा माता मंदिर ते श्री राम मंदिर, म्युन्सीपल पार्क दरम्यान सायंकाळी पाच वाजता शोभायात्रा निघेल व श्री राम मंदिर, म्युन्सीपल पार्क येथे शोभायात्रेचा समारोप होईल. तीन दिवसीय कार्यक्रमासाठी सर्व ब्राह्मण बंधूंनी सहकुटूंब, सहपरीवार उपस्थिती द्यावी, असे आवाहन समिती व समस्त ब्राह्मण सामाजाच्या वतीने करण्यात आले आहे.