Private Advt

सुनोदा गावातील वयोवृद्ध शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या

रावेर : तालुक्यातील सुनोदा गावातील ज्ञानदेव जयराम सपकाळे (65) या शेतकर्‍याने स्वतःच्या शेतात कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नापिकीच्या नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
ज्ञानदेव सपकाळे हे नेहमीप्रमाणे शेती कामासाठी तसेच गुरा-ढोरांना चारा आणण्यासाठी गुरुवारी सकाळी सायकल घेवून स्वतःच्या शेतात गेले होते. सकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास त्यांचे भाऊ सुरेश सपकाळे यांना ते निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली. प्रमोद सपकाळे यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृत शेतकर्‍यावर सुनोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून हंगाम होत नसल्याने सततच्या नापिकीच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असे परीवारातील सदस्यांनी सांगितले.