Private Advt

नाशिकमध्ये दोन घटनांमध्ये तिघांचे विहिरीत आढळले मृतदेह

नाशिक : दीरासह भावजयीचा एका विहिरीत तर दुसर्‍या एका घटनेत दोघा तरुणांचे मृतदेह विहिरीत आढळले असून नाशिक जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडााली आहे. या घटना निफाड, लासलगाव परीसरातील देवगाव येथे घडल्या आहेत.

दिर-भावजयाचा सोबत विहिरीत आढळला मृतदेह
एका विहिरीत पायल पोटे आणि संदीप पोटे या दोघांचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने उलट-सुलट चर्चा होत आहेत. दुसर्‍या एका विहिरीत तरुणाचा तर सटाणा येथील ठेंगोडा येथे विहिरीत शेत मजुराचा मृतदेह आढळून आला आहे.