Private Advt

जलजीवन मिशन अंतर्गत नळ जल योजनेच्या कामासाठी 90 लाख मंजूर

आमदार शिरीष चौधरी यांनी केले भूमिपूजन : पाणीप्रश्‍न सुटणार !

रावेर : जलजीवन मिशन योजने अंतर्गत मतदारसंघातील मंजूर झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोमवारी रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.

या कामांचे भूमिपूजन
वडगाव, ता.रावेर तसेच तालुक्यातील भोर व धूरखेडा येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परीषद सदस्या सुरेखा पाटील, बापू पाटील, आरती अजय वाघोदे, दीपाली सतीष वाघोदे, अमजद तडवी, रामभाऊ वाघोदे, संजय वाघोदे, सुनील वाघोदे, योगेश वाघोदे, किरण वाघोदे, मुसा तडवी, दिलीप पंडित, भोर सरपंच चित्रा मोरे, उपसरपंच नंदा आनंद बाविस्कर, सुरेखा शिंदे, मानसी पवार, रुपाली पाटील, चंद्रकांत चांगळे, राजू सवर्णे, आनंद बाविस्कर, विनायक महाजन, दिलीप वैद्य, प्रकाश पाटील, दिलरुबाब तडवी, उमेश गाढे, योगेश पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, राकेश घोरफडे, सावन मेढे, धुमा तायडे, धुरखेडा सरपंच विश्वनाथ बाबुराव पाटील, रामभाऊ भोई, माणिक सपकाळे, वडगाव भोर धुरखेडा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.