Private Advt

शेवाळेतील दाम्पत्यास मारहाण : पाच संशयीतांविरोधात गुन्हा

पारोळा : जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेसह पतीला शिविगाळ व मारहाण केल्यानंतर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील शेवाळे येथे सोमवार, 18 रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.

पाच जणांविरोधात गुन्हा
लताबाई पाटील (45, शेवाळे, ता.पारोळा) या आपल्या पती व मुलांसह वास्तव्याला आहे. शेती काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 18 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लताबाई पाटील ह्या घरी एकट्या असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीतील कल्पनाबाई श्रीराम पाटील, श्रीराम लोटन पाटील, सचिन श्रीराम पाटील, रामचंद्र लोटन पाटील, भैया रामचंद्र पाटील (सर्व राहणार शेवाळे, ता.पारोळा) यांनी शिविगाळ करून मारहाण करीत जखमी केले. एकाने तिच्या पतीला फायटरने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लताबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुनील वानखेडे करीत आहेत.