Private Advt

जुन्या भांडणाच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने वार : दोघांविरोधात गुन्हा

जळगाव : जुन्या वादातून ऑईस्क्रीम विक्रेत्याला मारहाण करण्यात आली तर त्यांच्या मुलावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून केला हल्ला
रामलाल दलिचंद पुरभीया (45, रौनक कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आईस्क्रीमची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कामात त्यांचा मुलगा गोविंद पुरभिया मदत करतो. बुधवार, 20 एप्रिल रोजी रामलाल यांनी त्यांची गाडी अजिंठा हाऊसींगच्या गेटजवळ लावली होती. दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून गणेश भगवान लोहार (रा.म्हाडा कॉलनी, जळगाव) आणि रोहित शिंदे (रा.हनुमान नगर) यांनी रामलाल यांनी बेदम मारहाण केली तर त्यारचा मुलगा गोविंद याच्या हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर दुखापत केली.

दोघा संशयीतांविरोधात गुन्हा
जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा रामलाल पुरभिया यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी गणेश लोहार आणि रोहित शिंदे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जितेंद्र राजपूत करीत आहे.