Private Advt

चिंचोली गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबविली

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरटे सक्रिय
विश्वनाथ वामन कोळी (40, दिनकर नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. नोकरीवर जाण्या-येण्यासाठी (एमएच 19 एएस 2575) क्रमांकाच्या दुचाकीचा वापर करतात. 18 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते तालुक्यातील चिंचोली येथील बसस्थानकाजवळ दुचाकीने कामानिमित्त आले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. मंगळवारी 19 एप्रिल रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेववून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.