Private Advt

अहंकाराने पतन होते ; भक्तीच्या भावसागराने जीवनाला दिशा मिळते

साध्वी सर्वेश्वरी : साई मंदिराचा आठवा वर्धापनदिन उत्साहात साजरा

रावेर : जीवनात एक व्रत असणे गरजेचे आहे. महिलांनी अनेक नात्यांना गुंफून ठेवले पाहिजे. कौटुंबिक कलह होवू न देता, त्यात गोडवा, मायेचा ओलावा राखण्यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजे. रामराज्य निर्माणासाठी रामांची गरज नसून त्यांचे विचार, आदर्श आचरणात आणले तर पुन्हा रामराज्य निर्माण होईल. अहंकाराने पतन होते, भक्तीच्या भावसागराने जीवनाला दिशा मिळते, असे अमृततुल्य विचार साध्वी शर्वेश्वरी दीदी यांनी रावेरात व्यक्त केले. अष्टविनायक नगरातील साईबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला आठ वर्ष पूर्ण झाल्याने आयोजित कीर्तन रुपी सेवा ह.भ.प. साध्वी सर्वेश्वरी यांनी केली.

रामजन्मोत्सवानिमित्त महाआरती
सकाळी सात वाजता पूजा, नऊ वाजता महाभिषेक सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष विजय गोटीवाले यांच्याहस्ते कपिल महाराज यांच्या मंत्रोपचाराच्या संगतीने करण्यात आला. दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव व महाआरती करण्यात आली. 12 ते 5 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री 8 ते 10 यावेळी साध्वी सर्वेश्वरी देवी यांचे कीर्तन झाले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उद्योजक श्रीराम पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख योगीराज पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष जे.के.पाटील, सिंधी समाजाचे अध्यक्ष दिलीप तोलाणी, राज कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र चौधरी, डॉ.दिगंबर पाटील, हदयरोग तज्ज्ञ डॉ.योगेश पाटील, प्रकाश पाटील, तापी इरीगेशनचे सोपान पाटील, महेंद्र पवार, चैतन्य महाजन, अनिल पाटील, हवालदार सतीश सानप, राजेंद्र करोडपती, पुरुषोत्तम पाटील, राहुल चौधरी, मुन्ना अग्रवाल, कुणाल बागरे, विवरा शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन धनजी लढे, विवरे विकासोचे चेअरमन गोपाळ राणे, मानस कुलकर्णी, सुरेश राणे, योगेश पाटील (खिर्डीकर), अमोल पाटील (तामसवाडी), चंदन पाटील (विटवा), अजिंक्य वाणी, विवरे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, छोटू फेगडे व परीसरातील साई भक्त उपस्थित होते. यशस्वीतेसाठी साईमंदिर कमेटीचे अध्यक्ष चंद्रकांत विचवे, उपाध्यक्ष सुनील सोपान महाजन, सचिव आशालता राणे, सदस्य पी.एम.महाजन, जे.एस.पाटील, माजी उपाध्यक्ष राजेश महाजन, सदस्य यशवंत महाजन, गोकुळ महाजन, एस.के.महाजन, सुनील सुरेश महाजन, पंडित चौधरी, अरुण चौधरी, सागर चौधरी, योगराज ऑफसेटचे राजू महाजन, रमेश सपकाळे यांचे सहकार्य लाभले.