Private Advt

वरणगावातील 45 वर्षीय महिलेचा विनयभंग

वरणगाव : शहरातील एका भागातील 45 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील एका भागातील 45 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयीत आरोपी संदीप लखीचंद बनवे (38) हा तरुण शनिवार, 9 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दारू पिऊन महिलेच्या घरात अनधिकृतपणे शिरला व त्याने महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. पीडीतेने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयीत आरोपी संदीप लखीचंद बनवे विरोधात तक्रार दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.