Private Advt

चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक

नंदुरबार। तालुका पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात मुद्देमालासह तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील कोठली येथे शशिकांत पाटील यांच्या घरातून 29 मार्च रोजी 27 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल व 50 हजार रुपयाची चोरी झाली होती. घाटाणे येथील तुळशीराम पाटील यांची 9 मार्च रोजी 70 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरांनी चोरुन नेली होती. याबाबत तालुका पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी या गुन्ह्यांचा आढावा घेवून तपास करण्याच्या सुचना पोलिस यंत्रणेला दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुद्देमालासह तीन संशयितांना अटक केली आहे. अक्षय वळवी, धर्मा भोसले, नानू भोसले अशी त्यांची नावे आहेत.