Private Advt

गावठी पिस्टल बाळगणारा वरणगावातील तरुण जाळ्यात : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ/जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरून गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या वरणगावातील तरुणाला अटक केली आहे. आरोपी विरोधात जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनुराग लक्ष्मण सुनगत (20, रा.जामनेर, ह.मु.वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत हा तरुण हातात गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. मंगळवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयीत आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत (वरणगाव) यास अटक करण्यात आली तसेच आरोपीकडून 20 हजार रुपये किंमतीची गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
जामनेर पोलिसात किशोर राठोड यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी अनुराग लक्ष्मण सूनगत (20, रा.सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर, वरणगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय अशोक महाजन, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक विनोद पाटील, नाईक किशोर राठोड, नाईक रणजीत जाधव, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, चालक कॉन्स्टेबल अशोक पाटील आदींच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.