Private Advt

रेल्वेखाली आल्याने अनोळखीचा मृत्यू

धरणगाव : तालुक्यातील आनोरे शिवारात अज्ञात वयोवृद्ध व्यक्तीचा मालगाडीखाली आल्याने मृत्यू झाला. धरणगाव ते चावलखेडा रेल्वे स्थानकादरम्यान सुरत-भुसावळ अप रेल्वे मार्गावर भुसावळकडे जाणार्‍या रेल्वे मालगाडीखाली आनोरे शिवारात एका बेवारस अनोळखी 60 ते 65 वर्ष वय असलेल्या वृद्ध व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस नाईक चंदुलाल सोनवणे करीत आहेत.