Private Advt

आडगाव शिवारात शेतातील झोपडी पेटली ; तीन लाखांचे आर्थिक नुकसान

पारोळा : पारोळा तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतातील झोपडीला लागलेल्या आगीनंतर त्यात ठेवलेला तीन लाख रुपये किंमतीचा कापूस जळून खाक झाले. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

शेतकर्‍याला मोठा आर्थिक फटका
प्रवीण गुलाबराव पाटील (30, रा.आडगाव, ता.पारोळा) यांचे आडगाव शिवारातील शेत गट क्रमांक 47 मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी झोपडी बनवली असून त्या झोपडीमध्ये त्यांनी 30 क्विंटल कापूस भरून ठेवला होता. दरम्यान, शुक्रवार, 1 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागल्याने आगीत जवळपास 25 क्विंटल कापूस जळून खाक झाला. यात सुमारे तीन लाख रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर चौधरी करीत आहे.