Private Advt

जळगावात महिलांना शिविगाळ करणार्‍या चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील मेहरुण परीसरातील रामनगर येथे काहीही कारण नसतांना दारुच्या नशेत महिलांना शिविगाळ करत दमदाटी करणार्‍या एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना केली शिविगाळ
रामनगरातील रहिवासी आफरीन जमीर शेख (30) या शनिवारी रात्री घरासमोर असतांना त्यांना एकाने दारुच्या नशेत शिवीगाळ करत वाद घातला. याचदरम्यान संबंधिताच्या कुटुंबातील दोन महिला व आणखी एका जणानेही आफरीन शेख यांना शिविगाळ करत दमदाटी केली. याचवेळी आफरीन यांची शेजारी असलेल्या सुरेखा रवींद्र सोनवणे या भांडण सोडविण्यासाठी आल्यानंतर त्यांनाही संबंधितांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. आफरीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुरेश अशोक सोनार व इतर तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.