Private Advt

गुजरातमधील संशयीत लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाने गस्तीदरम्यान गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणार्‍या संशयीताच्या मुसक्या आवळल्या. दीपक छत्रसिंह सोलंकी (22, दिंडोली, रमीया सोसायटी, रूम नं.14, सुरत, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 22 रोजी रात्री प्लॅटफार्म क्रमांक तीन ते चारच्या पुढील आऊटर साईडच्या बाजूला इंजिन शेडकडेसंशयीत दीपक सोलंकी हा चोरीच्या उद्देशाने लपून असल्याने त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगदीश ठाकूर, धनराज लुले, आरपीएफचे एएसआय प्रल्हाद सिंग यांनी ही कारवाई केली. तपास हवालदार जगदीश ठाकूर करीत आहेत.