Private Advt

सोशिअल मिडियावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अवमान करणाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंदवा

महाविकास आघाडीची मागणी

जळगाव –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या फोटोचे विडंबन करून आढळ मावशी व मौलानांचा चेहरा व इतर चेहरे लावुन तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहि फोटोचे विद्रुपीकरण करून वेगवेगळ्या कॉमेंट्स फेसबुक वर पाठवणारे हेमंत डोलारे यांच्यावर कडक कारवाई करावी असे निवेदन जळगाव महाविकास आघाडीतर्फे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सायबर क्राईम सेल जळगावचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले होते कि ,  अनेक दिवसापासून शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे  ,  शरद पवार  ,  सोनिया गांधी , राहुल गांधी , प्रियंका गांधी , अजितपवार , सुप्रिया सुळे व देशातील ईतर नेत्यांच्या बाबतीत उपरोधिक टीका टिप्पणी करून त्यांच्या चेहऱ्यांचे विद्रुपीकरण करून देशातील व समाजातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करून एका विशिष्ट राजकीय पार्टीचे समर्थन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांची बदनामी करून चुकीची प्रतिमा समाज माध्यमात  हेमंत डोलारे पसरवित आहेत.  त्यांच्या या बेताल वागण्याने समाजात तेढ निर्माण होत असुन , राजकीय व सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम हेमंत डोलारे हे करीत आहेत . त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी गुन्हा नोंदविण्यात यावा.

हे  निवेदन देतांना अशोक लाडवंजारी , शामकांत तायडे , शरद तायडे ,  सुशीलकुमार शिंदे ,  राजू मोरे , डॉ. रिजवान खाटिक ,  अमोल कोल्हे , अकिल पटेल , विशाल देशमुख , नईम खाटिक , संजय जाधव , किरण चव्हाण काँग्रेसचे प्रदीपदादा सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.