Private Advt

शिव जयंती निमित्त युवासेने तर्फे २०७ नागरिकांचे लसीकरण

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त युवासेना जळगाव महानगर तर्फे नेहरू चौक येथे दोन दिवसीय भव्य लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे उदघाटन शिवसेना संपर्क प्रमुख संजयजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्या दिवशी १२ ते १४ वयोगातील १०५ तर १५ पुढील वयोगातील १०२ नागरिकांनी लस घेतली.

या वेळी महापौर जयश्री महाजन, नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, शोभा चौधरी, सरिता कोल्हे, ज्योती शिवदे, मानसिंग सोनवणे, मनोज चौधरी, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, मतीन सय्यद आदी उपस्थतीत होते. यशस्वीतेसाठी यशश्री वाघ, वैष्णवी खैरनार, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, गिरीश सपकाळे, यश सपकाळे, चेतन कापसे, यश लोढा, उमाकांत जाधव, अभिजित रंधे, विशाल वाणी, कुलभूषण पाटील, राधेशाम कोगटा, प्रशांत नाईक, सागर हिवराळे, हितेश ठाकरे, अमोल मोरे, तेजस दुसाने, यश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.