Private Advt

अभिमानास्पद ! पाचोऱ्याच्या तरुणाला फेसबुकमध्ये मिळाले सव्वा कोटींचे वार्षिक पॅकेज

 पाचोरा ( प्रतिनिधी ) कुरंगी तालुका पाचोरा येथील रहिवाशी तरुणाने उच्च शिक्षण घेऊन मेटा फेसबुक मध्ये सव्वा कोटी रूपयांचे वार्षिक पॅकेज घेऊन निवड झाल्याने त्याच्या या निवडीने आमदारकिशोर पाटील व माजी आमदारदिलीप वाघ, सरपंच व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे
कुरंगी तालुका पाचोरा येथील रहिवासी असलेले व हल्ली मुक्काम मुंबई येथील दूरदर्शन मध्ये काम करणारे रामराव संतोष पाटील यांचा लहान मुलगा आशिष पाटील याने बी ई कॅम्पुटर चे शिक्षण इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मुंबई येथे घेतले. पुढचे उच्च शिक्षण मास्टर ऑफ सायन्स हे फोरीडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मायामी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका येथे घेतले, त्याने नुकतेच मेटा फेसबुक सिलिकॉन व्हॅली काॅलिफोरर्निया अमेरिका येथे १कोटी २५लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घेऊन निवड झाली. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  त्याच्या या निवडीबद्दल पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील ,माजी आमदार दिलीप वाघ,कुरंगी बाबरूड गटाचे सदस्य पदमसिंग पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, वडील रामराव पाटील,चांदसर येथील मामा सुनील शिंदे, सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार व्हि .एन. पाटील ,रंगराव पाटील, आबा साखरे ,कुरंगी सरपंच मनिषा गणेश पाटील , योगेश ठाकरे,पत्रकार नगराज पाटील , अजय जैस्वाल,भारत शंकपाळ, यांच्यासह ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून कौतुक केले.