Private Advt

32 वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना जळगाव शहरातील सम्राट नगरात शुक्रवार, 11 मार्च रोजी सायंकाळी घडली. प्रशांत रवींद्र मांडोळे (32) असे मयताचे नाव आहे. आत्महत्या करण्यामागील स्पष्ट कारण कळू शकले नाही. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
प्रशांत मांडोळे हा एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण खालच्या मजल्यावर असतांना प्रशांतने वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. भावाने आत्महत्या केल्याचे मोठा भाऊ हेमंत मांडोळे याच्या लक्षात आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आई-वडील व नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. मांडोळे यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.