Private Advt

भडगाव तालुक्यात ४ विकासोंच्या निवडणुका ; १४० उमेदवारी अर्ज दाखल.

राजकीय वातावरण झाले गरम आता लागले माघारीकडे लक्ष

भडगाव – तालुक्यातील वाडे श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, नुतन भडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, पळासखेडे विविध

कार्यकारी सहकारी सोसायटी, गिरड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या चारही संस्थांची मुदत संपली असुन दुसर्या टप्यात पंचवार्षीक निवडणुकीचा
कार्यक्रम लागला आहे. या वरील चारही संस्थांसाठी ४ एप्रिल रोजी मतदान होणार आहेत तर प्रत्येकी १३ जागांसाठी ही निवडणुक होत आहे. चारही
संस्थांच्या निवडणुकीच्या एकुण ५२ जागांसाठी एकुण १४० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दि.९ रोजी झालेल्या छाननीत चारही संस्थांपैकी फक्त नुतन भडगाव विकासोचे ३ अर्ज छाननीत नामंजुर झालेले आहेत. इतर सर्व उमेदवारी अर्ज मंजुर
झालेले आहेत. वाडे विकासो ५२ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. गिरड विकासो ४० उमेदवारी अर्ज दाखल आहेत. पळासखेडे २६ उमेदवारी अर्ज दाखल
आहेत. नुतन भडगाव विकासो १९ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. अशी माहिती भडगाव सहाय्यक निवडणुक विभागाच्या सुञांनी दिली.

आता निवडणुकीचा बिगुल वाजला असुन मोर्चे बाधणी, पॅनल तयार झाल्याचे दिसत आहेत. अनेक नवखे उमेदवारही या निवडणुक लढविण्यासाठी
गुढघ्याला बाशींग बांधुन आहेत. आतापासुनच गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले असुन या निवडणुकांचा आखाडा चांगलाच गाजणार असे
चिञ निर्माण झाल्याचे दिसत आहे.