Private Advt

खिर्डीत एक लाख 17 हजारांचा अवैध मद्यसाठा जप्त

खिर्डी : धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रावेर तालुक्यातील खिर्डी गावातून एक लाख 17 हजार 220 रुपये किंमतीचा देशी दारुचा अवैध मद्यसाठा जप्त करीत दोन आरोपींना अटक करण्यात आली. कुलदीप भागवत जैस्वाल व जितेंद्र रमेश जैस्वाल अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
खिर्डी येथे देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जळगाव अधीक्षक सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित ओं.कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे, वाहन चालक सागर देशमुख, मधुकर वाघ, नितीन पाटील, विठ्ठल हाटकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.