Private Advt

कोरोना काळात राज्यात वाढला बालविवाहाचा आकडा

जळगाव –  सावित्रीबाई फुले यांनी ज्या रूढी परंपरा समाजातून निघून जाव्यात यासाठी कष्ट घेतले त्या रूढी परंपरा अजूनही समाजात सुरु आहेत अश्या वेळेस समाजाला प्रबोधनाची गरज आहे असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी कोरोना काळात वाढलेल्या बालविवाहाचा दाखला दिला. सोलापूर 350 बालविवाह 18 वर्षे वय दाखवून लावून देण्यात आले असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्या म्हणाल्या की महिला व बालकल्याण विभाग राज्यातील महिलांच्या सुरक्षितेसाठी कटिबद्ध आहे समाजातील चुकीच्या रूढी परंपरा काढून टाकण्यासाठी महिलांवरील अत्याचार पुसून टाकण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोरोना काळात महाराष्ट्रातले ६० हजार पुरुष कोरोनामुळे दगावले त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर झाला आहे. महाराष्ट्र शासन अशा कुटुंबांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. जळगाव जिल्ह्यात 847 पुरुषांचे कोरोनामुळे झाले होते. ज्या पैकी569  कुटुंबांना मदत मंजूर झाले आहे.

 

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेतली.व यावेळी अनेक तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या असून महिलांच्या तक्रारी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या ऐकून घेत असून अधिकाऱ्यांना निपटारा करण्याचा यावेळी सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती.

राज्य शासन महिला आयोगातर्फे  अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या 20 मुलांना 5 लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. 569 महिलांना लाभ देण्यात आला आहे. तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यात 20 बालविवाह रोखण्यासाठी कारवाई देखील संबंधित विभागाकडून करण्यात आली. हे कार्य कौतुकास्पद आहे, परंतु सोलापूर 350 बालविवाह 18 वर्षे वय दाखवून लावून देण्यात आले, यात नोंदणी अधिकारी, उपस्थित असलेले समिती सदस्य यांच्यावर तात्काळ कारवाईचे केली जावी आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा अमलबजावणी केली जावी असेही महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन, येथे झालेल्या ‘महिला आयोगआपल्या दारी’ या उपक्रमात मध्ये सांगितले.

 

 

वय २१ कि १८ हे जनताच ठरवेल 

मुलीच्या लग्नाचे वय हे १८ असावे कि २१ असावे हे स्वतः जनताच ठरवेल असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांनी सांगितले कि राज्यात मुलींच्या लग्नाचे वय हे १८ असावे कि २१ यामध्ये मतमतांतरे आहेत. अश्या वेळेस म्हणून याबाद सर्वक्षण करण्यात येणार आहे व याबाबत केंद्राला कळवण्यात येणार आहे.

 

राज्यपालांचे मानले आभार

शक्ती विधायक मंजूर झाल्यावर राज्यपालांनी या विधेयकावर तत्काळ स्वाक्षरी केल्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार कमी होणार असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

नरेंद्र मोदींवर टीका
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संसदेत बोलत होते की भाषणात बोलत होते हे समजत नव्हते. याचबरोबर ते देशाचे पंतप्रधान आहेत की भारतीय जनता पक्षाचे हे देखील मोदींना समजले नाही अशी टीका यावेळी रुपाली चाकणकर यांनी केली. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र काँग्रेस वर केलेली टीका ही चुकीची असून यामुळे महाराष्ट्रातला जनमानस त्यांच्यावर नाराज झाला आहे असेही यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या. याच बरोबर कोरोना काळात केंद्र शासनाने राज्य शासनाला कोणतीही मदत केली नाही तरीदेखील महाराष्ट्र राज्य कोरोना विरुद्ध जिंकला असेही यावेळी त्या म्हणाल्या.
आंतरजातीय विवाह व्हावे यासाठी घेणार पुढाकार
गेल्या काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांनी मुसलमान मुलाशी हिंदु मुलीचे लग्न लावून त्या विवाहाला शिवविवाह असे म्हणाल्या होत्या. यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. त्या ठिकाणी झालेला विवाह हा माझ्या कार्यकर्ता असीम होता त्यासाठी मी त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची शपथ घेत दोघांनी विवाह केला. असेच आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह जिल्ह्यात व राज्यात वाढावे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षावर टीका
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोप केला होता की उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्या भरूनच शिवसैनिकांनी सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला केला. याबाबत चांदेकर यांनी भाजपवर टीका केली त्या म्हणाल्या की भाजपचा सत्ताधारी महा विकास आघाडी वर खोटे आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.