Private Advt

लतादीदींचे ते पोर्ट्रेट जळगावमधील कलाकाराने रेखाटलेले

। जळगाव प्रतिनिधी।

गानसम्राज्ञी लतादीदी अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या त्या आपल्या आठवणी मागे ठेवून. रविवारी, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी जळगावमधूनही त्यांच्या स्मृती जागवल्या गेल्या पण कलाकाराच्या नजरेतून.

जळगामधील प्रसिद्ध कलाकार मितेन लापसिया यांनी 22 जुलै 2016 रोजी, लतादीदींचे एक सुंदर पोर्ट्रेट हे स्मार्ट फोन आर्ट पद्धतीत साकारले होते. ते लतादीदींच्या ट्वीटवर अकाउंटवर इतके दिवस असायचेच पण ते आज त्यांच्या अंतिम प्रवासावेळीही सोबत होते. त्याचे काही फोटो मितेन लापसिया यांनी ‘जनशक्ती’ला पाठवले. मितेन लापसिया यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची असंख्य व्यक्तिचित्रे आजपर्यंत स्मार्ट फोन आर्ट प्रकारात रेखाटली आहेत.