Private Advt

महापालिका स्तरावर होणारा लोकशाही दिन रद्द 

 

जळगाव – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने सोमवार महापालिका आयुक्त स्तरावरील होणारा ऑफलाइन लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याचे महापालिका प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे. कृपया नागरिकांनी याची सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.असे आवाह मनपा तर्फे करण्यात आले आहे.