Private Advt

सुट्टीच्या दिवशीही तहसीलदार कामावर 

तातडीने कामे व्हावी यासाठी केले कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन 

 

 

प्रतिनिधी । यावल येथील तहसील कार्यालयामध्ये शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील मंडळाधिकारी,तलाठी सह महसुलचे अधिकारी, कर्मचारी दिवसभर कामकाज करतांना दिसले वेळेत १०० खरिप व रब्बीची पिक पाहणी नोंदी सह विविध कामे तातडीने व्हावे म्हणुन सर्वचं लगबगीत होते तत्पुर्वी तहसीलदार महेश पवार यांनी एक बैठक घेऊन शनीवार व रविवार या दोन सुट्टीच्या दिवशी कशा पद्धतीने आपण काम करू शकू या बाबत मार्गदर्शन केले.
खरीप आणि रब्बी हंगामातील ई पिक पाहणी शेतकरी बांधवांनी शेत बांधा वरून केली असुन या नोंदी नोंदी तलाठ्याने पडताळूण त्या शासनाच्या संकेतस्थळावर नोंदवायच्या असतात तेव्हा हे काम १०० टक्के व्हावे म्हणुन तहसिलदार महेश पवार यांनी शनीवार व रविवार हे दोन सुटीचे दिवस निवडले आणी या दोन दिवसात प्रशासकिय कामकाज सक्षम रित्या करीत ई पिक पाहणी १०० टक्के पुर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला शनीवारी सुटीच्या दिवशी तहसिल कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी आणी तलाठी यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये सुट्टीच्या दिवशी आपण सर्व प्रलंबित कामे वेळेत कसे पूर्ण करू शकतो तांत्रीक अडचणी सोडवण्या करीता प्रत्येक मंडळाधिकारी व त्यांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी एकत्र बसुन ही सर्व कामे आपण पुर्ण करू शकतो तसेच महिन्याभरा वरील प्रलंबित फेरफार नोंदी, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या देखील टाकण्यात आल्या तसेच ओडिसी अहवाल, डीएसडी अहवाल तसेच ज्या नोटिसा प्रलंबित होत्या त्यांची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही करण्यात आली तेव्हा शनीवार सुटीचा दिवस असुन देखील दिवसभर यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांची लगबग दिसून आली दिवसभर तहसील कार्यालयामध्ये कामकाज सुरू होते. कार्यालयात तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी सचिन जगताप, एम. एच. तडवी, शेखर तडवी, पी. ए. कडनोर, बबीता चौधरी, मिलिंद देवरे सह सर्व तलाठी उपस्थित होते.
वेळेत कामे महत्वाची.
सुटीच्या दिवशी महसुल विभागाचे संकेतस्थळ हे चांगल्या प्रकारे काम करते विविध ऑनलाइन नोंदी या जलद होतात व ऐरवी दैनदिनी कामकाज मुळे अनेक ऑनलाइन नोंदी प्रलंबीत होत जातात तेव्हा सुटीच्या दिवशी रेंगाळलेली कामे पुर्ण व्हावी म्हणुन सर्वांना सोबत घेवुन कामे करत आहोत.
महेश पवार, तहसिलदार यावल