Private Advt

युवकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत प्राधान्य देणार – मेहबूब शेख

 

जळगाव | राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी युवा संवाद यात्रेनिमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत युवकांना पक्षातर्फे प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

 

यावेळी युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, युवक सरचिटणीस ललित बागुल, महिला शहराध्यक्ष मंगला पाटील आदींची उपस्थिती आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. यावेळी जळगाव नंदुरबार व धुळे या तीनही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत युवा पिढीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांनी प्रेरित केले जाणार आहे. याच बरोबर जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहेत ज्यामध्ये युवकांचा देखील सहभाग आहे. अशा वेळेस जळगाव जिल्ह्यातील मोठा तरुण राष्ट्रवादीशी जोडला जाणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलली यात्रा.
यावेळी बोलताना शेख म्हणाले की खरं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये या यात्रेचा शुभारंभ होणार होता मात्र कोरोनाचा चा वाढता प्रादुर्भाव पाहता ही यात्रा पुढे ढकलण्यात आली. याच बरोबर यात्रेदरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.

जळगाव शहर महानगर अध्यक्ष पदासाठी 18 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याआधी एकूण 28 युवक या पदासाठी उत्सुक होते मात्र काही युवक मुलाखतीसाठी आले नाहीत. येत्या काही दिवसात जळगाव शहर युवक महानगर अध्यक्षाची देखील घोषणा करण्यात येईल असे शेख म्हणाले