Private Advt

शेती आणि शेतकऱ्यांना मारक असा अर्थसंकल्प – आ. चिमणराव पाटील

जळगाव -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत केला.केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प होता.  या बाबद एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली कि ,शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक असा अर्थसंकल्प आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. शेतकऱ्यांना या अर्थ संकल्पना तून काही तरी मिळेल अशी आशा होती मात्र शेतकऱ्यांची यामुळे पुरती निराशा झाली असून शेतकऱ्यांना मारक असा हा अर्थसंकल्प आहे. याच बरोबर बेरोजगारीचा प्रश्न इतका मोठा असताना रोजगारा बद्दल देखील या अर्थसंकल्पात काहीही बोलले गेले नाही. यामुळे युवा पिढीची मोठी हानी झाली आहे.