Private Advt

बहिणाई ब्रिगेडच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदि ऍड उज्वला पाटिल

जळगाव – आखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेडच्या झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते डोंबिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्हॉकेट उज्वला जयंत पाटिल यांची बहिणाई ब्रिगेडच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली.

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप भोळे व बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा हर्षा बोरोले यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .याप्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे , बहिणाबाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुनीता येवले , महानगर अध्यक्षा श्रीमतीसाधना लोखंडे , महानगर सचिव अनिता पाटिल , हेमंत बोरोले आदि मान्यवर उपस्थित होते . सदर नियुक्ती बद्दल बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशा कोल्हे , अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाशराव पाटिल व समाज बांधवानी ऍड. उज्वला पाटिल यांचे अभिनंदन केलेले आहे .