Private Advt

खिर्डी येथे स्वच्छते अभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात

खिर्डी ता. रावेर- खिर्डी ते भामलवाडी रस्त्यावरील सांडपाण्याची मोठी गटार सुमारे 5 ते 8 दिवस झाले साफसफाई करण्यात आली असल्याने जागो जागी कचरेचे ठीग लागलेले असून परत तिच घाण सुकून पुन्हा गटारीत जात आहे व रस्त्यात पसरत असुन गटारी तुबंत आहे. मात्र त्याची विल्हेवाट लावण्याचा मुहूर्त अजुनही खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीला मिळालेला नाही सदरील रस्त्यावरील कुळ-कचरा मुळे डास व माशांचे प्रमाणात वाढ झाली असल्याने मोठी दुर्गंधी येत असुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सविस्तर वृत असे की खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या भामलवाडी रस्त्यावरची सांडपाण्याची मोठी गटार जे.सि.पी ने गळ काढली असता ती अतिशय खोल व रुंदी त वाढ झाली असल्याने फार मोठी झालेली असुन शेजारी आठवडे बाजारपेठ व धार्मिक स्थळ असल्याने तेथे मोठी वर्दळ असते त्यातच कोरोना ची तिसरी लाटेला नागरिक समोरे जात असताना या अस्वच्छतेमुळे अजून दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणाची वाट ग्रामपंचायत पाहत तर नाही ना? या मुळे कोणी रात्री बे रात्रीच्या वेळेस गटारीत पडुन तेथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून कोणास दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. त्याच बरोबर या गटारीचे बांधकाम मंजूरी मिळालेली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मग याला मुहूर्त मिळणार कधी? असा संताप सवाल सुज्ञ नागरिकांनकडून होत आहे.

विनायक जहुरे-सामाजिक कार्यकर्ता.

खिर्डी बुद्रुक ग्रा.प.स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असुन सरपंच, सदस्य व ग्रावि.अधिकारी यांचे कोठे विकासाबाबत नियोजन व आराखडा नसुन गाव विकासाबाबत मागे राहत आहे. काही प्रश्न विचारले असता फक्त आश्वासन देत आहे.