Private Advt

धक्कादायक : यावल तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

यावल । तालुक्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस अली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुलांनी यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून दोन्ही संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून गावातील दोन अल्पवयीन मुलांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.