Private Advt

शहरातील ३९ इमारतींना नोटीस

नगररचना विभागातर्फे कारवाई

जळगाव – जळगाव शहरातील तब्बल ३० दुकानांना दोन दिवसात नोटीस बजावण्यात येणार आहेत.अशी माहिती नगररचना विभागातर्फे देण्यात अली आहे.  महापालिकेच्या नगररचना विभागाची बैठक मंगळवारी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, तसेच नगररचना अधिकारी व अभियंता उपस्थित होते. यावेळी शहरातील इमारतीच्या तळमजल्यावरील कारवाईबाबतचा प्रश्‍न उपस्थित झाला. त्याबाबत विभागाने आतापर्यंत काय केले, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. याबाबत नगररचना अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले, की शहरातील नेहरू चौक ते घाणेकर चौक या महात्मा गांधी रस्त्यावरील इमारतींच्या तळमजला वापराबाबत सर्वे पूर्ण करण्यात आला आहे. यातील तब्बल ३९ इमारतींचा सर्वे करण्यात आला आहे. त्यांच्या तळमजल्यावरील दुकाने असून त्याचा वापर व्यवसायासाठी होत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात आता संबंधितांना येत्या दोन दिवसात नोटीस बजावण्यात येणार आहे.