Private Advt

मनपातील ‘ते’ नेते लावत आहेत जळगावकरांना शेंडी 

४०० कोटी रुपये येणार कसे ? शहराचा संपूर्ण विकास होणार कसा ?   

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे जळगाव शहरातील विविध रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यात शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र संपूर्ण जळगाव शहराचे रस्ते जर सुस्थितीत आणायचे म्हणायचे झाले तर जळगाव मनपाला ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याचे जनशक्तीशी बोलताना मनपातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. अश्या वेळेस मनपातील ‘ते’ नेते संपूर्ण जळगावचा विकास कारणार अस म्हणत नागरिकांना ‘शेंडी’ लावण्याचे काम करत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव शहरात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र यात केवळ प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जळगाव शहरातील इतर भागातील नागरिकांना देखील त्यांच्या प्रभागातील रस्ते व्हावेत अशी इच्छा आहे. जळगाव शहराच्या संपूर्ण रस्ते करायला घेतले तर मनपाला 400 कोटींचा निधी लागणार आहे. या क्षणाला इतका निधी मनपाकडे नाहीये आणि तो मिळवणार कसा ? याचेही ठोस नियोज़न झाले नाहीये. जळगाव शहरासाठी १५० कोटी रुपयाचा निधी आणण्यासाठी प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते तर चारशे कोटी मिळवायला किती वर्षे लागतील.आणि तो ते आणणार कसे? हा प्रश्न उपस्थत होत आहे.  यामुळे संपूर्ण जळगाव शहराचा विकास होणार ही केवळ ‘कल्पनाच’ राहणार का ? आणि मनपातील काही नेते जळगाव शहरातील नागरिकांना शेंडी लावत आहेत का ?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निधी मिळणार कसा?
जळगाव शहराच्या संपूर्ण विकासासाठी ४०० कोटींचा निधी लागणार असेल तर हा निधी नक्की कोणत्या आधारावर मनपातील नेते आणू शकतील याबाबत कोणालाही काहीच माहित नाहीये. मनपाकडे स्वतःचे असे उत्पन्न नाहीये.तर संपूर्ण शहराचा विकस होणार कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उपस्थित होत असलेले प्रश्न
१) शहराला निधी मिळवून देणार कसा?
२) शहराच्या विकासासाठी काही ठोस असे नियोजन आहे का?
३) निधी मिळाल्याशिवाय नियोजन होत नाही तर निधी मिळेल असे अशा कशी केली जात आहे?