Private Advt

गणेश कॉलनीतून दुचाकी लांबविली

जळगाव – शहरातील एकाची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे.गणेश कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण हरी पाटील (वय-४९) रा. गणेश कॉलनी, जळगाव हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गुरुवारी २० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घरासमोर ३० हजार रुपये किमतीची (एम.एच. १९ सीसी ०४८७) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. प्रवीण पाटील यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केल्यानंतर कुठेही मिळून आली नाही. रविवारी २३ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याने विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.