Private Advt

विद्यापीठातील गोंधळावर एन – मुक्ताचे बोट

जळगाव – विद्यापीठात वाद प्रतिवाद होत असताना त्यात एन – मुक्ताने उडी घेतली आहे.यात त्यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ  जळगावच्या प्रशासकीय कारभारामध्ये राज्यपालांनी लक्ष्य घालण्याची विनंती केली आहे. 

 

 

कुलगुरू पी. पी.पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर क. ब. चौ.उमवि मध्ये जे प्रभारीराज सुरू झाले आहे. ते आजतागायत सुरू आहे. उच्चशिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या विद्यापीठामध्ये अचानक ज्या गोंधळ निर्माण करणाऱ्या घटना घडायला सुरुवात झाली. विद्यापीठाच्या वित्त व लेखाअधिकारी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ व कुलसचिव पदावर फार काळ कोणीही व्यक्ती काम करू शकत नाहीत विद्यापीठात कुलसचिव बी.बी.पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सहा प्र. कुलसचिव नियुक्त झालेत व त्यांनी राजीनामा दिला आता तर प्रा. आर एल शिंदे यांनी देखील राजीनामा दिलेला आहे तो मंजूर होण्याची शक्यता कमीच आहे. कारण सगळ्यांनाच आता स्वतःची अब्रू वाचवायची आहे. कुलसचिव यांची नियुक्ती पाच वर्षाची असते. पण आता जळगाव विद्यापीठात एक वर्षात पाच कुलसचिव पाहावयाची वेळ आलेली आहे. मध्यंतरी प्रभारी वित्त व लेखा अधिकारीसुद्धा नियुक्त केले गेले व त्या सर्वानी राजीनामा दिला २०१८ मध्ये वित्त व लेखा अधिकारी प्रा. कऱ्हाड यांनी देखील राजीनामा देऊन गेल्यानंतर सहा वेळा वेगवेगळ्या व्यक्तींकडे प्रभार दिला गेला त्यातील तीन वेळा गोहिलयांच्याकडे दिला .पण विद्यापीठात असे काय घडले की वित्त व लेखा अधिकारीपण फार काळ टिकत नाहीत.असा सवाल यावेळी संघटनेने उपस्थित केला आहे.

 

विद्यापीठात सर्व प्रभारीराज सुरू असताना संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व संचालक, विद्यार्थी विकास या पदांसाठी मात्र अगदी घाईघाईने अर्ज मागवून त्यांची नियुक्ती करण्याचा अट्टाहास कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनी का केला? तसेच प्राधिकरणाच्या सदस्यांनी हस्तक्षेप का केला नाही?हे न उलगडणारे कोडे आहे. या सर्व गोष्टी व्यक्ति विशिष्ट डोळ्यांसमोर ठेवून झालेले आहे. असा आरोप एन-मुक्ता प्राध्यापक सघटनेने केला आहे.

संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे पदही सतत एक प्रकारे परीक्षाच देत आहे.पदावर ही कुणीही व्यक्ती फार काळ टिकत नाही सतत राजीनामा व प्रभारी बदलाचा कार्यक्रम सुरू आहे. सततच्या राजीनामा सत्राला आता विद्यापीठ कर्मचारी सुद्धा वैतागले आहेत. हे सगळे प्रकार कुलगुरू व प्र-कुलगुरू का थांबू शकत नाहीत? याची उत्तरे येणाऱ्या काळात एन-मुक्ता आंदोलनातून मागितल्या शिवाय राहणार नाही.

विद्यापीठ प्राधिकरणावर निवडून आलेले घटक ही या सर्व प्रकरणाला जबाबदार आहेत. हे सर्व प्रकार थांबण्यासाठी राज्यपाल महोदयांनी व्यक्तिगतरित्या क.ब. चौ. उमवि मध्ये लक्ष घालून उपाय करावा. प्रसंगी शिस्तीचा बडगा उगारून काही शस्त्रक्रिया करावी लागली तरी चालेल पण विद्यापिठाची लक्तरे वेशीवर टांगता कामा नये, या सर्व प्रकारची वेळीच दखल सर्व प्राधिकरणावरील सदस्यांनी घ्यावी. अन्यथा या विरोधात एन-मुक्ता लवकरच जनआंदोलन उभे करेल तसेच सर्व विद्यापीठ प्राधिकरणावरील सदस्यांना घेराव घातला जाईल.