Private Advt

सावकारे कार ट्रान्सफर प्रकरणी तिघांना अटक

 

जळगाव – भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी बुधवारी अशोक विठ्ठल पाटील, अकिल शेख रहमान शेख, प्रशांत जगन्नाथ भाेळे या तिघांना पाेलिसांनी अटक केली.

खोटेनगरातील अशोक पाटील यांचा माेबाइल वापरला गेला अाहे. दरम्यान, आरटीओ एजंट पप्पू भोळेने हा मोबाइल वापरल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर अकिल नावाच्या एजंटने त्यांचा मोबाइल नंबर अपडेट करून दिला असल्याची तांत्रिक माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार या तिन्ही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी झाली. दुसरीकडे दक्षता समितीमधील सहायक परिवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या दोघांनी ६ व ७ जानेवारी रोजी जळगावात येऊन आरटीओ कार्यालयात झाडाझडती घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळले. यानंतर जे. बी. कुलकर्णी, गणेश देवरे, सुनील पाटील व मनोज पाटील या चार लिपिकांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर बुधवारी पाेलिसांच्या पथकाने चाैकशीअंती तीन जणांना अटक केली अाहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिली.

या प्रकरणी अशोक विठ्ठल पाटील यांनी स्वतःच्या मोबाईल गैर वापरा प्रकरणी  सखोल चौकशी व्हावी म्हणून पोलीस अधिक्षक मुंडे यांना निवेदन दिले होते.मात्र पोलिसांनी तारकारदारालाही अटक केल्याने या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे.