Private Advt

पालकमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा झेंडा

नंदुरबार – प्रतिनिधी आ दिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडत शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकला आहे.

धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी 13 जागांवर सेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.नगरपंचायतीच्या 17 जागांमध्ये शिवसेना 13 जागांवर विजयी तर काँग्रेस 3 तर भाजपा 1 जागेवर विजयी झाले.

धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी दि 19 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यात धडगाव नगर पंचायत निवडणूकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने भगवा फडकवला असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना मोठा धक्का धक्का दिला आहे. मतमोजणीत प्रभाग 1 अनु.जमाती पावरा ललीता तुकाराम – भाजपा विजयी, प्रभाग 2 अनु.जमाती पावरा ललीता संजय -काँग्रेस विजयी, प्रभाग 3 सर्वसाधारण, पावरा कल्याणसिंग भरतसिंग काँग्रेस विजयी, प्रभाग 4 अनु.जमाती पराडके भरतसिंग पारशी शिवसेना विजयी, प्रभाग 5 अनु.जमाती पावरा रघुनाथ विरसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 6 अनु.जमाती पावरा राजेंद्र गुलाबसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 7 अनु.जमाती सरदार पारशी पावरा शिवसेना विजयी, प्रभाग 8 अनु.जमाती ब्राम्हणे विजय छगन शिवसेना विजयी, प्रभाग 9 अनु.जमाती (स्ञी) चव्हाण भावना मिनेश शिवसेना विजयी, प्रभाग 10 अनु.जमाती (स्ञी) पावरा कविता राॅकेश शिवसेना विजयी, प्रभाग 11 अनु.जमाती (स्ञी) पराडके दिपीका जामसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 12 पावरा धनसिंग दादला शिवसेना विजयी, प्रभाग 13 सर्वसाधारण, पावरा पुरुषोत्तम दिलवरसिंग शिवसेना विजयी, प्रभाग 14 सर्वसधारण पावरा गिरजा अंबाजी काँग्रेस विजयी, प्रभाग 15 सर्वसाधारण (स्ञी) पावरा सुनंदाबाई हेमंत शिवसेना विजयी, प्रभाग 16 अनु.जमाती (स्ञी) वळवी विद्या शिवराम शिवसेना विजयी, प्रभाग 17 अनु.जमाती (स्ञी) पराडके शर्मिला जमसर शिवसेना विजयी झाले.त्यामुळे शिवसेनेचा भगवा फडकला असून धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता बसणार असल्याचे निश्चित झाले आहे.