Private Advt

ब्रेकिंग न्यूज : खडसेंच्या बालेकिल्ल्यात चंद्रकांत पाटलांची सरशी

बोदवड – बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. सकाळी १० वाजता निकालाला सुरवंट झाली. बोदवड नगरपंचायत हा खडसेंचा बालेकिला म्हटला जात होता. मात्र यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला आहे.

नगरपंचायतीतिल १७ जागांपैकी ९ जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीला ७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपचा धुव्वा उडाला असून केवळ १ जागा मिळवता अली आहे. 

या निवडणुकीत प्रमुख मुकाबला हा आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार एकनाथराव खडसे यांच्यात होता. दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती . निवडणुकीच्या दरम्यान नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. यात पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि रोहिणी खडसे यांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी धमकावल्याचे प्रकरण खूप गाजले. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

यानंतर आमदार गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली. एकीकडे भाजप-सेना युती तुटली असतांनाही बोदवड येथे मात्र दोन्ही पक्षांचे नेते एकत्रीत आल्याचा संदेश सर्वत्र गेला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी याचे खंडण केले असले तरी यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.