Private Advt

नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा

 

जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मंगळवारी  सायंकाळी निवेदन देण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील एका प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बदनामीकारक व धमकी देणारे वक्तव्य केले. अशा प्रकारे धमकी व बदनामी करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अश्या बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा तातडीने दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन मंगळवारी १८ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना देण्यात आले.

या निवेदनावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, ओबीसी महानगराध्यक्ष जयेश भावसार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांच्या विषयी बोलताना विचार केला पाहिजे. त्यांच्यावर केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो.

आमदार सुरेश भोळे