Private Advt

एसटी कर्मचाऱ्याची धावत्या कार खाली आत्महत्या

अकोला | st karmcahri atmahatya |सटी महामंडळाच्या संपात सहभागी असलेल्या एका एसटी कर्मचारी अरविंद अनंत चव्हाण याने धावत्या   धावत्या कारखाली उडी घेऊन आत्महत्या केली. हि  घटना १६ जानेवारी रोजी घडली. अकोट-अकोला मार्गावर देवरी जवळ त्याने हि आत्महत्या केली. 

मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव अरविंद अनंत चव्हाण असून, तो शहादा आगारात चालक पदावर कार्यरत होता. संपात सहभागी कर्मचारी हा मागील काही महिन्यांपासून मानसिकरीत्या खचलेला असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याला खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. तो मूळगावी देवरी येथे राहत होता. एसटी चालकाचे मानसिक संतुलन बिघडल्याने तो इतरत्र फिरत होता. दरम्यान, देवरी फाटानजीक रस्त्यावरील चालत्या वाहनासमोर त्याने धाव घेतली. यामध्ये एसटी कर्मचारी गंभीर जखमी झाला. ज्या वाहनासमोर त्याने उडी घेतली, त्याच वाहनाने त्याला उपचाराकरिता अकोट येथे भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती दहीहांडा पोलिसांनी दिली.