Private Advt

मालमत्तांच्या पुनर्मोजणीसाठी मनपाच्या हालचाली

डॉक्टरांच्या आक्रमक भूमिके नंतर मनपा नरमल

 

जळगाव – बेसमेंट वापरात नसुनही अरहिवास या हेडींगमधे वाढीव कर आकारला असल्याची तक्रार पत्रकार परिषदेत जळगाव शहरातील खासगी डॉक्टरांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना केली होती. याच बरोबर आंदोलनाचा इशाराही दिला होता. याची नोंद घेत मनपा प्रशासनाने खासगी डॉक्टरांच्या हॉस्पिटलचे फेर मूल्यांकन करण्याचे ठरवले आहे. जळगाव शहरातील  खासगी डॉक्टरांना मनपाच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. 

जळगाव मनपाकडून शहरातील डॉक्टर्स,हॉस्पिटलधारकांना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.
मनपाद्वारे डॉक्टरांवरिल,हॉस्पिटलसंबंधीत विविध करांची आकारणी नियमबाह्य,अन्यायकारकरित्या केली जात आहे. त्याद्वारे मनपा प्रशासन डॉक्टरांचे आर्थिक शोषण करित आहे. असा आरोप जळगाव शहरातील खासगी डॉक्टरांनी केला होता. मनपाद्वारे डॉक्टरांच्या या अडवणूक,पिडवणूकीबद्दल डॉक्टर वर्गात प्रचंड असंतोष दिसून येत होता मात्र डॉक्टर्स आक्रमक होताच मनपाला नारामती भूमिका घ्यावी लागली आहे.

 

या विषयनावर होती डॉक्टरची हरकत

बेसमेंट वापरात नसुनही अरहिवास या हेडींगमधे वाढीव कर आकारला

बहूतांश डॉक्टरांचे निवासस्थान व दवाखाना एकाच ठिकाणी असल्याने मनमानी पद्धतीने रहिवास व अरहिवास असे क्षेत्रफळ अन्यायकारकरित्या अवाजवी पद्धतीने दाखवून अव्वाच्या सव्वा कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे.

पार्किंग एरिया साठीही कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे.